कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी | sugarcane worker | Pune

2021-03-17 915

पुणे - राज्यातील साखर कारखाने सध्या सुरू आहेत. ऊसतोड कामगार गेल्या वर्षी लोकडाऊन मध्ये अडकून पडले होते . ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यामुळे गावी परतत असताना संचारबंदीमुळे रस्त्यात अडकून पडले होते. पुन्हा लोकडाऊन जर करणार असाल तर आधी ऊस तोड कामगाराची व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी आज साखर आयुक्तांनकडे करण्यात आली .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, आरोग्य, पोलीस प्रशासनाकडून कामगारांना नाहक त्रास दिला जातो, अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना विमा योजना मिळत नाही, कारखाने आपली जबाबदारी स्वीकारत नाहीत,या आणि अशा अनेक मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले,साखर उपयुक्त पांडुरंग शेळके यांनी निवेदन स्वीकारले याबाबत उसतोड कामगार संघटना पदाधिकारी उपस्थिती होतेअनेक मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले.

Free Traffic Exchange

Videos similaires